दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान - My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination

MPSC Latest News, MPSC Answer Keys, MPSC Interview Schedules, MPSC Exam Syllabus, MPSC Results, MPSC Timetable, MPSC Question Papers

Post Top Ad

Tuesday, November 6, 2012

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान :
* 'अ' जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
* 'ड' जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
* 'क' जीवनसत्त्व म्हणजे 'अ‍ॅस्कॉरबीक अ‍ॅसिड' शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये 'क' जीवनसत्त्व असते.
*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला 'पूर्णान्न' म्हणतात.
* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.
* 'ड' जीवनसत्त्वाअभावी 'मुडदूस व दंतक्षय' हा रोग होतो.
* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी  संबंधित आहे.
* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.
* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.
* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
* 'ओ' या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास 'सर्वयोग्य दाता' असे म्हणतात.
* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.
* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.
* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
* मलेरिया या रोगाचा प्रसार अ‍ॅना फिलिप्स डासामुळे होतो.
* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी
* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
*नॉर्मल सलाईनमध्ये 'सोडियम क्लोराईड' असते.
* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.
* रक्तप्रवाहातील 'लिपोप्रोटीन' नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.
* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण 'लिपिड प्रोफाईल'द्वारे मोजले जाते.
* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य 'साखर' हा घटक करतो.
* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.
* मेंदूतील ट
Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com

1 comment:

Unknown said...

on of the best site for Mpsc.

Post Top Ad