* राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
* किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
* अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
* डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
* माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
* डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
* न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
* रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
* शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
* इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
* अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
* कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
* डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
* आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
* न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
* यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
* मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले
५) विविध ऑपरेशन्स
* ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
* ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम
* ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
* ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
* ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
* ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
* ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
* ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com
No comments:
Post a Comment