Assistant Clerk Exam Paper ZP Nanded 2011
कनिष्ट सहायक भरती
जिल्हा परिषद , नांदेड
वर्ष 2011
वेळ : १.३० तास प्रश्न : ८०
गुण : 200
१. ज्ञानेश्वर यांनी-------- हा ग्रंथ लिहिला,त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणतात.
अ) गोरक्ष गीता ब) भावार्थदीपिका क) विवेकसिंधू ड) भागवत गीता
२. बोलता बोलता त्याचा कंठ ---------आला.
अ) वळून ब) दाटून क) फुटून ड) झटून
३. खाली सोडून दिलेल्या संधीयुक्त शब्दाचा पर्याय ओळखा.
महा + ऋषी
अ) महोर्शी ब) महार्षी क) माहार्षी ड) महर्षी
४. 'साहस हे जीवनामध्ये मिथासारखे आहे 'या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
अ) सामान्य नाम ब) विशेषनाम क) भाववाचक नाम ड) धातुसाधित नाम
५. 'वाघ्या ' शब्दाचा विरुधालिंगी शब्द निवडा.
अ) वाघीण ब) वाघरू क) व्याघ्र ड) मुरली
६. खालीलपैकी एकवचनी नाम कोणते
अ) दिशा ब) आज्ञा क) सभा ड) जाऊ
७. खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.
"सारे पोपट उडाले"
अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी क) कर्मणी ड) भावे
८. " पाउस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली." या वाक्याचा प्रकार ओळखा
अ) साधे वाक्य ब) संयुक्त वाक्य क) मिश्र वाक्य ड) यापैकी नाही
९. कोणते विरामचिन्हे वाक्यात दिलेले नाही.
सुधीर म्हणाला," अबब! केवढा मोठा हत्ती!"
अ) पूर्णविराम ब) अर्धविराम क) स्वल्प विराम ड) अपूर्णविराम
१०.खालील वाक्यातील काळ ओळखा
'आम्ही सिनेमा पाहत आहोत'
अ) पूर्ण वर्तमानकाळ ब) अपूर्ण वर्तमानकाळ क) अपूर्ण भूतकाळ ड)अपूर्ण भविष्यकाळ
११. 'समीरण' या शब्दाचा समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा
अ) वीज ब) सूर्य क) वारा ड) युध्द
१२. 'उन्नती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय ओळखा
अ) परागती ब) अवनती क) संमती ड) प्रस्तुती
१३. खालील पर्यायापेकी शुद्ध शब्द ओळखा
अ) कुशल ब) कुकर्म क) कुटीर ड) कुजन
१४. 'कोल्हेकुई' या आलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता
अ) क्षुद्र लोकांची ओरड ब) निरर्थक बडबड क) कंटाळवाणे लांबलचक बोलणे ड) कोल्ह्याचे ओरडणे
१५. खालील शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा
मोजका आहार घेणारा
अ) मीतखाऊ ब) उपाशी क) मिताहारी ड) भुकेला
१६. खालील म्हणीचा अर्थ ओळखा
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
अ) लाकुडतोड्याचा जीव कुर्हाडीवर
ब) कुर्हाडीचा दांडा उभाच असावा
क) सारे वेभव गेले, तरी खुणा शिल्लक राहतात
ड) आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत
१७. खालील वाक्यप्रचारचा अर्थ ओळखा
टेंभा मिरविणे
अ) मशाल मिरविणे ब) उजेड पाडणे क) पोत मिरविणे ड) तोरा दाखविणे
१८. 'ययाती' या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय
अ) ना.सी. फडके ब) वि.सं. खांडेकर क) प्र.के. अत्रे ड) द. म. मिरासदार
१९.गाळलेल्या जागी जोड शब्दाचा उरलेल्या भागाच्या पर्याय ओळखा
या फुलाचा रंग लाल-------आहे.
अ) शार ब) जर्द क) भडक द) गर्द
२०. पत्रलेखनातील 'क.लो.अ.' या अक्षराचा पूर्ण अर्थ कोणता
अ) कळावे, लोकांना प्रेम असावे ब) कळावे, लोभी असावा
क) कळावे, लोभ असावा ड) कदाचित, लोक असतील
21. A person skilled in climbing high hills and mountains is called a ---------
a) hiller b) climber c) trekker d) mountaineer
22. What is the structure with a sleep slope that children use for sliding down?
a) swing b) seesaw c) slide d) ladder
23. Who uses a spade to dig a garden?
a) farmer b) worker c) gardener d) forester
24. Write the similar meaning word for the word? ioyal
a) royal b) cheat c) faithful d) humble
25. Which of the following words does not belong to the word expressing 'feeling'?
a) angry b) happy c) friend d) sad
26. A person who sells medicines is called-------?
a) doctor b) medical representative c) chemist d) shopkeeper
27. He dug a deep-------------in his garden?
a) Whole b) vole c) hole d) hall
28. Write one word for the words- 'Not likely to happen'.
a) nonhappen b)unable c) impossible d)unlike
29. Fill in the blanks with correct word.
He could not ---------------his insult.
a) bare b)bear c)bair d)bire
30. What instruction will a teacher give when students are making noise in the class
a) Speak loudly b) Go out c) keep quite d) shut up
31. You ask permission from your father for watching TV. How would your father deny the permission?
a) Yes, you can watch b) No, You can't c)Go, on! d) You may do so
32. Which of the following is an instruction
a) May I see your feet? b) Can I see you feet? c) Your feet are very dirty d) Show me your feet
33. Find the odd man out?
a) strong b) rich c) boy d)tall
34. Pick out the sentences with the wrong use of the article
a) I want to drink a water b) he is an engineer
c) They are watching the stars at night d) He is a very simple man
35. Find out the adjective from the given sentence
His painting were lovely
a) His b) were c) lovely d) painting
36. Write the correct form of the verb 'taste' and complete the sentence
Honey---------sweet.
a) tasting b) taste c) tastes d)has
37. Choose the correct adjective form of the word' healthy'
a) healthy b) healthily c)healther d) wealthy
38. Complete the good thought choosing the proper word from the given alternatives
'If you have the will,there's always a----------'
a) success b) wish c) way d) determination
39. Which of the following is an indoor game
a) football b) carroom c) cricket d) kabaddi
40. Which animal wags its tail when it is happy or excited
a) elephent b)donkey c) cow d)dog
४१. १९९९ या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला असल्यास त्या वर्षीचा डॉ.ऑबेडकर जयंती केव्हा येईल?
अ) बुधवार ब) गुरुवार क) शुक्रवार ड) मंगळवार
४२. P,Q,R,S यापेकी कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत , तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?
अ) ८ ब) ४ क) ६ ड) १२
४३. कोणत्या मोठ्यात मोठया तीन अंकी संखेला २४ ने भागले तर बाकी ७ आणि ३६ ने भागले तर बाकी १९ उरेल
अ) ९४३ ब) ९५५ क) ९९१ ड) ९९७
४४. एका संखेच्या निमपटीच्या पाच पटीत त्याच संख्येची दुप्पट मिळविल्यास उत्तर १३५ येते तर ती संख्या कोणती
अ) ४० ब) ३० क) ४५ ड) ३६
४५. ७.८४ + ९.३ - ५.३७ = ?
अ) १३.०३७ ब) ११.७७ क) १२.१०३ ड) १२.००३
४६. एका संख्यचा वर्गमुळात २१ मिळविले असता येणारे उत्तर २८ येते तर ती संख्या कोणती
अ) ४९ ब) १६ क) ७ ड) १५
४७.तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती
अ) ३७०० ब) १५०० क) ३५०० ड) ९९९
४८. एका संख्येस ३,४ व ५ ने भाग जातो, तर खालील पेकी असत्य विधान कोणते
अ) त्या संखेस १२,६, १० ने भाग जातो ब) त्या संख्येस ६,५,८ ने भाग जातो
क) त्या संख्येस २,१०,१५ ने भाग जातो ड) त्या संख्येस १०,१२,१५ ने भाग जातो
४९. २० कामगार रोज ६ तास काम करून ३५ वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी १५ कामगारांना रोज किती तास जास्त काम करावे लागेल
अ) ८ तास ब) ६ तास क) २ तास ड) १ तास
५०. एका संख्येचा शेकडा ५० काढून येनार्या संख्येचा शेकडा ५० काढला असता उत्तर २६ येते तर ती संख्या किती
अ) १०४ ब) ११४ क) १३० ड) २६०
५१. एका शाळेत सन २००५ मध्ये १००० विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी विद्यार्थी ची संख्या २० % ने वाढत असेल तर सन २००७ मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील
अ) १४४० ब) १४०० क) १२०० ड) १२४०
५२. पाच वर्षांपूर्वी योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ होते. आज योगेशचे वय २१ वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी महेशचे वय किती
अ) २५ वर्षे ब) २० वर्षे क) २८ वर्षे ड) २४ वर्षे
५३. मुद्दल = ८००० रु. मुदत = ५ वर्षे, दर = द.स.द.शे. ७ तर सरळव्याज किती
अ) ३५०० रु. ब) २८०० रु. क) २५०० रु. ड) २१०० रु.
५४. एक वस्तू ६४ रुपयांना विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू ३७ रु. ला विकल्यास होतो, तर वस्तूची मूळ किमत किती.
अ) ६० रु. ब) ५० रु. क) ५५ रु. ड) ७० रु.
५५. सुभाषने ५ एप्रिल २००५ ते १२ जुलै, २००५ पर्यंत दररोज अर्धा लिटर दुध घेतले. दुधाचा दर प्रतिलिटर २१ रु. असल्यास त्याने एकूण किती रुपयाचे दुध घेतले.
अ) १०३९.५ रु. ब) १३९५ रु. क) १०२९ रु. ड) १०२९.५ रु.
५६. २.५ कि.मी. लांब व ६ मी. रुंद रस्त्यावर १३ से.मी. जाडीच्या मुरुमाचा थर टाकण्यास किती घ.मी. मुरूम लागेल.
अ) २२५० ब) २.२५० क) २२.५ ड) २२५००
५७. एका चोरसाची परिमिती ९.२ मी. आहे,तर त्या चोरसाचे क्षेत्रफळ किती.
अ) ५.२९ चो.मी. ब) ५२.९ चो.मी. क) ५.२९ चो. मी. ड) ८१.४ चो मी.
५८. ८ मी. २४ से.मी. लांबीच्या एका लोखंडी पाईपचे ८० मी.मी. लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील.
अ) १०३ ब) १०३० क) १००३ ड) १३
५९. राहुलने ०५ एकदिवसीय सामन्यात सरासरी ४८ धावा केल्या. पहिल्या तीन सामन्यांची सरासरी ४० धावा असून चौथ्या सामन्यात त्याने ७० धावा केल्या आहेत तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या.
अ) ४० ब) ७० क) ५० ड) ४८
६०. नांदेड जिल्ह्यात -----------तालुके आहेत.
अ) १४ ब) १५ क) १६ ड) १७
६१. नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाउस-----------तालुक्यात पडतो.
अ) किनवट ब) भोकर क) देगलूर ड) धर्माबाद
६२.नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत.
अ) सुभाष झनक ब) रवीशेठ पाटील क) माणिकराव ठाकरे ड) डी. पी. सावंत
६३. नांदेड जिल्ह्यात आज रोजी ---------- ग्रामपंचायत आहेत.
अ) १३०० ब) १३०९ क) १३१९ ड) १३२९
६४.नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धरण येत नाही
अ) मनार ब) येलदरी क) लेंडी ड) विष्णुपुरी
६५. नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत.
अ) अजयसिंग बिसेन ब) ओमप्रकाश पोकर्ण क) गंगाधरराव चाभरेकार ड) माणिकराव इंगोले
६६. खालीलपैकी कोणाचे अभंग 'गुरु ग्रंथ साहिब' या ग्रंथात आढळतात
अ) संत एकनाथ ब) संत चक्रधर क) संत नामदेव ड) संत तुकाराम
६७. नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत
अ) एच.व्ही. आरगुंडे ब) डॉ.शरद कुलकर्णी क) अजय गुल्हाणे ड) रघुनाथ बामणे
६८. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पेरा खालीलपैकी कोणत्या पिकाचा असतो
अ) कापूस ब) तूर क) सोयाबीन ड) ज्वारी
६९. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य अधिकारी पदावर ------- हे काम पाहत आहेत.
अ) पारस बोथरा ब) डॉ. शरद कुलकर्णी क) विठल बरडे ड) अजय सावरीकर
७०. खालीलपैकी कोणत्या तालुका मुख्यालयी रेल्वे स्टेशन नाही
अ) किनवट ब) भोकर क) धर्माबाद ड) देगलूर
७१. या जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत, त्यापैकी एकूण---------तालुक्यांच्या मुख्यालयी आज रोजी ग्रामपंचायत अस्तीत्वात आहे.
अ) २ ब) ३ क) ४ ड) ५
७२. खालीलपैकी कोणती योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात नाही
अ) पर्यवान संतुलित ग्राम समृद्धी योजना ब) संजय गांधी निराधार योजना
क) निर्मल ग्राम योजना ड) जननी सुरक्षा योजना
७३.सन २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यामधील ० ते ६ वयोगटातील मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे-----------इतके आहे.
अ) ८८७ ब) ८९७ क) ८७७ ड) ९०७
७४. खालीलपैकी कोणती नदी या जिल्ह्यातून वाहत नाही
अ) सीता ब) आसना क) मनार ड) अडान
७५. खालीलपैकी कोणत्या नदीवर आंतरराज्य सिंचन प्रकल्प आहे
अ) गोदावरी ब) मांजरा क) सीना ड) लेंडी
७६. या जिल्ह्यामधून एकूण--------आमदार विधानसभेवर निवडून दिले जातात.
अ) ७ ब) ८ क) ९ ड) १०
७७. या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या तालुक्याच्या पंच्यात समितीचे कार्यालय खालीलपैकी कोणत्या कार्यालयाच्या आवारात आहे.
अ) जिल्हापरिषद ब) पोलीस अधीक्षक क) महानगरपालिका कार्यालय ड) जिल्हाधिकारी कार्यालय
७८. या जिल्ह्याच्या मुक्यालायी असलेल्या विद्यापीठचे कुलगुरूपद खालीलपैकी कोणी भूषविलेले नाही
अ) श्री. शेषराव सूर्यवंशी ब) श्री.धनंजय येडेकर क) श्री. जनार्धन वाघमारे ड) श्री. गो.रा. म्हेसेकर
७९. दि. ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान या जिल्ह्यात झालेल्या शालेय पट पडताळणीत एकूण-----विध्यार्थी अनुपस्थित आढळून आले.
अ) १ लाख १० हजार ब) १ लाख २७ हजार क) १ लाख ४२ हजार द) १ लाख ५० हजार
Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com
No comments:
Post a Comment