Beed Collector Office Clerk Exam Paper (2009 - 10) - My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination

MPSC Latest News, MPSC Answer Keys, MPSC Interview Schedules, MPSC Exam Syllabus, MPSC Results, MPSC Timetable, MPSC Question Papers

Post Top Ad

Friday, May 1, 2015

Beed Collector Office Clerk Exam Paper (2009 - 10)

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
लिपिक भरती २००९-१०
वेळ: दोन तास
प्रश्न : १००
गुण : २००
१. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यसचिव कोण आहेत?
अ) म. श्री. जॉनी जोसेफ ब) श्री. एम.एन. रॉय क) श्री. जे पी. डांगे
द) श्री. अरुण बोंगीरवार
२. २००९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला?
अ) श्री. मनमोहनसिंग ब) श्रीमती सोनिया गांधी क) श्रीमती शेख हसीना
ड) श्री बराक ओबामा
३. २०१० चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे?
अ) ठाणे ब) पुणे क) नाशिक ड) औरंगाबाद
४. लोकसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत?
अ) श्रीमती मीराकुमार ब) श्री. करिया मुंडा क) श्री. महम्मद अन्सारी
ड) श्री अरुण जेटली
५. पंजाब राज्याचे राज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे?
अ) श्री. डी. वाय. पाटील ब) श्रीमती प्रभा राव
क) श्री. शिवाजीराव पाटील चाकूरकर ड) श्री.के.नारायण
६. पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते?
अ) बारामती ब) अकलूज क) सोलापूर ड) मालेगाव
७. सार्क आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली?
अ) डिसेंबर १९८५ ब) डिसेंबर १९९५ क) डिसेंबर १९८० ड) डिसेंबर १९९०
८. भारताची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार किती आहे?
अ) १००.८७ कोटी ब) १०२.८७ कोटी क) १०५.८७ कोटी ड) ११०.८७ कोटी
९. महाराष्ट्राची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार किती आहे?
अ) ९.६७ कोटी ब) ८.६७ कोटी क) १०.६७ कोटी ड) ७.६७ कोटी
१०. सन २००१ च्या पाहणीनुसार सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते?
अ) गोवा ब) महाराष्ट्र क) मिझोरम ड) केरळ
११. भारतात केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
अ) तामिळनाडू ब) महाराष्ट्र क) कर्नाटक ड) आंध्रप्रदेश
१२. आंबेजोगाई येथे कोणत्या देवीचे प्रसिध्द मंदिर आहे?
अ) रेणुकामाता ब) योगेश्वरी क) भवानीमाता ड) साप्तसृंगी
१३. बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य कोठे आहे?
अ) अंबेजोगाई ब) गेवराई क) नायगाव ड) आष्टी
१४. बीड येथे शनीचे प्रसिध्द मंदिर कोठे आहे?
अ) राक्षसभुवन ब) मांजरासुम्भा क) धारूर ड) पाटोदा
१५. कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते?
अ) सिंधुदुर्ग ब) रायगड क) रत्नागिरी ड) ठाणे
१६. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे?
अ) कोल्हापूर ब) पुणे क) सातारा ड) रायगड
१७. पोस्टाची कार्ड व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे?
अ) पुणे ब) नाशिक क) रत्नागिरी ड) सोलापूर
१८. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
अ) श्रीवर्धन ब) माथेरान क) महाबळेश्वर ड) आंबोली
१९. महाराष्ट्रात किती प्रशासकीय/महसूल विभाग आहेत?
अ) ४ ब) ६ क) ५ ड) ७
२०. 'बल्लापूर' कशासाठी प्रसिध्द आहे?
अ) सिमेंट ब) कागद कारखाना क) साखर ड) अभयारण्य
२१. रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला?
अ) स्टीफनसन ब) राईट बंधू क) इलियास होव ड) फरन हाईट
२२. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
अ) लॉस एंजोलीस ब) टोकियो क) न्यूयॉर्क ड) प्यारीस
२३. मराठीत एकूण किती व्यंजने आहेत?
अ) २४ ब) ३४ क) ५४ ड) ४५
२४. मराठी व्यंजना मध्ये अनुनासिक वर्ण किती आहेत?
अ) ५ ब) ४ क) ३ ड) २
२५. वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या रुपात कोणताही बदल होत नाही,
त्यांना काय म्हणतात?
अ) विकारी शब्द ब) अविकारी शब्द क) क्रियापद ड) क्रियाविशेषण
२६. पदार्थांच्या अंगचे गुण किंवा धर्म दाखविण्यासाठी जे नाव दिले जाते
त्यास काय म्हणतात ?
अ) विशेषण ब) भाववाचक नाम क) सामान्य नाम ड) सर्वनाम
२७. 'सुसंवाद' चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
अ) वितंडवाद ब) विसंवाद क) संवाद ड) निर्विवाद
२८. पुष्पा हि हेमंताची आजी आहे. हेमा हि हेमंतची आई आहे. तर हेमाच्या
बहिणीची मुलगी पुष्पाची कोण असेल?
अ) नात ब) बहीण क) काकू ड) चुलती
२९. खुशी हि कमलेशची मुलगी आहे. प्रीती हि खुशीची आई आहे. तर कमलेश ची
सासू खुशीची कोण आहे?
अ) आई ब) आत्या क) मावशी ड) आजी
३०. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
अ) श्री. महम्मद अन्सारी ब) श्री. के. कृष्णकांत क) श्री. भेरोसिंग
शेखावत ड) श्री. बी.डी.जत्ती
३१. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
अ) श्री अश्विनीकुमार ब) श्री. नवीन चावला क) श्री. सुखदेव थोरात
ड) श्री. राजीव माथुर
३२. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री कोण आहेत?
अ) श्रीमती विमल मुंदडा ब) श्री. प्रकाश सोळंके क) श्री. जयदत्त
क्षीरसागर ड) श्री. छगन भुजबळ
३३. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत?
अ) श्री.रमेश आदस्कर ब) श्री.धनंजय मुंढे क) श्री. पंडितआण्णा मुंढे
ड) श्री.टी. पी. मुंढे
३४. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण आहेत?
अ) श्री. सुदामती गुट्टे ब) श्री. टी.पी. मुंडे क) श्री. पंकजा
पालवे-मुंडे ड) श्री. उषाताई दराडे
३५. धनेगाव धरण कोणत्या नदीवर आहे?
अ) सिंदफणा ब) मांजरा क) कुंडलिका ड) गोदावरी
३६. 'लीळाचरित्र' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ) रामदास स्वामी ब) चक्रधर स्वामी क) संत तुकाराम ड) मोरोपंत
३७. 'मालगुडी डेज' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
अ) श्री. आर.के. नारायण ब) श्री. सलमान रश्दी क) श्रीमती तस्लिमा
नसरीन ड) श्रीमती शोभा डे
३८. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिल्या आहेत?
अ) केशव कुमार ब) यशवंत क) मोरोपंत ड) गोविंदराज
३९. वि.वा. शिरवाडकर यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिल्या आहेत?
अ) आरती प्रभू ब) कुसुमाग्रज क) केशवसुत ड) माधवानुज
४०. भारताचे चलन जसे रुपया आहे, तसे जपानचे चलन कोणते आहे?
अ) येन ब) डॉलर क) युरो ड) पोंड
४१. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय लेखक कोण?
अ) पु.ल. देशपांडे ब) बा.भ. बोरकर क) वि.सं. खांडेकर ड) ना.सी. फडके
४२. भारताचे राष्ट्रगीत कोणी रचले आहे?
अ) बंकिमचंद्र चटर्जी ब) रवींद्रनाथ टागोर क) अरविंद बाबू ड)
मदनमोहन मालवीय
४३. 'बुकर ' पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय लेखिका कोण?
अ) आशापूर्णा देवी ब)दीपिका राणी क) अरुंधती रॉय ड) चंद्रमुखी बोस
४४. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मिथे राज्य कोणते?
अ) महाराष्ट्र ब) राजस्थान क) केरळ ड) उत्तर प्रदेश
४५. जिल्ह्यातील शेतजमिनींवर शेतसारा आकारण्याचे काम कोणता अधिकारी करतो?
अ) मुख्य कार्यकारी अधिकारी ब) जिल्हाधिकारी क) जिल्हा न्यायाधीश
ड) जिल्हा पोलीस प्रमुख
४६. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते?
अ) गटविकास अधिकारी ब) गटशिक्षण अधिकारी
क) महिला व बालकल्याण अधिकारी ड) यापैकी नाही
४७. नगराध्यक्ष पदाचा कालावधी किती असतो?
अ) १ वर्षे ब) ५ वर्ष क) २.५ वर्षे ड) ३.५ वर्षे
४८. तीव्र भावना व्यक्त करायची असेल तेव्हा कोणते विरामचिन्ह वापराल?
अ) स्वल्पविराम ब) लोप चिन्ह क) दंड ड) उदगार चिन्ह
४९. खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?
अ) जेवून ब) देवून क) धावून ड) चावून
५०. दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते?
अ) हि पर्स माझी आहे ब) हि माझी पर्स आहे क) पर्स हि माझीच आहे ड)
माझी हि पर्स आहे
५१.'पोलिसांनी चोर पकडला' या वाक्यातील प्रयोग कोणता?
अ) कर्तरी ब) कर्मणी क) भावे ड) अकर्मक कर्तरी
५२. वैशाख महिन्यातील पोर्णिमेला कोणता सन असतो?
अ) बुध्द पोर्णिमा ब) गुरु पौर्णिमा क) त्रिपुरारी पौर्णिमा ड) यापैकी नाही
५३. 'कुंभाड रचणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?
अ) भांडण करणे ब) संशय घेणे क) दुसर्यावर खोटे आरोप करणे ड) कट करणे
५४. 'दृष्टी आड सुष्टी' या म्हणीचा अर्थ काय?
अ) आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही ब) दृष्टी शिवाय सृष्टी दिसत नाही.
क) दुर्लक्ष करणे ड) दृष्टीत दोष असणे
55. To what tense does the following sentence belong?
They had read all the books
a) Present perfect b) simple past c) past perfect d) present continuous
56. Choose the correct Antonym for "Abundance"
a) Scarcity b) penalty c) Much d) Less
57. Choose the correct spelling from the group of words given below.
a) Wenesday b) Wendnasday c) Wenasday d) Wendnesday
58. Find the odd word out from the given words.
a) Professor b) principal c) student d) teacher
59. Choose the correct meaning of idiom or phrase
A white elephant
a) useless b) useful c) expensive d) expensive and useless
60. 'Optimist' या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो?
अ) देशभक्त ब) आशावादी क) नास्तिक ड) आस्तिक
61. 'संधीग्ध' या शब्द करिता इग्रजी शब्द कोणता?
a) anarchy b) ambiguous c) anonymous d) impracticable
62. Choose the correct preposition
Mohan is good-------music
a) at b) in c) with d) on
63. Choose the right form of verb
Please don't ask me to play on the Plano. I --------on it for years.
a) can't have played b) had played c) haven't played d) hadn't played
64. The story of one's own life-----------
a) autobiagraphy b) atobiography c) autobigroph d) autobiography
65. Select the right word which can be substituted for the explanation
'One who sells goods in small quantities.'
a) salesman b) seller c) retailer d) sailor
66.Select the word which is nearly opposite in meaning to the word 'Repel'
a) detract b) retract c) contract d) attract
67. What is the adjective form of 'happiness'?
a) happiest b) happening c) happy d) none of these
68. fill in the blank with correct article.
This is really----------enchanting story.
a) a b) the c) an d) no article
69. एका नेमबाजीच्या स्पर्धेला प्रत्येक अचूक नेमासाठी ५ गुण मिळतात व
नेम चुकल्यास मिळालेल्या पेकी १ गुण कमी होतो. एकूण २० प्रयत्न एका
स्पर्धकाने केले व त्याला ७० गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
अ) १० ब) १५ क) २० ड) १४
७०. दहा वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर १:७ होते,
परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १:२ होईल. तर केशवचे आजचे
वय किती?
अ) २५ ब) ३८ क) १४ ड) २४
७१. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे ८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने
दुसर्या प्रत्येक संघाशी १ सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने
होतील?
अ) २२ ब) २८ क) ५६ ड) ७२
७२. Find the odd word out from the given words.
a) SUN b) Clock c) Star d) Weel
७३. ९:०५ वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात अचूकपणे किती अंशाचा
कोण असेल ?
अ) १२० ब) ११७.५ क) ११२.५ ड)२०
७४. पुढील उदाहरण सोडवा. ८-४+१२+३x४+८+४-८ = ?
अ) २४ ब) २० क) ३२ ड) -३२
७५. २४ ताशी कालमापन पद्धतीनुसार 'मध्यान्नोतर ९ वाजून १८ मिनिटे म्हणजे------
अ) ०९:१८ ब) २१:१८ क) १८:०९ ड) १८:१८
७६. एका सांकेतिक भाषेत ८९७ म्हणजे 'काश्मीर सिमला', ९७४५ म्हणजे 'सिमला
केरळ उटी ', ५६८ म्हणजे 'उटी दार्जीलिंग काश्मीर तर 'उटी सिमला काश्मीर'
साठी कोणते संकेत वापराल?
अ) ४५९७८ ब) ५६७८ क) ८९७४५ ड) ५९७८
७७. घन ठोकळयाला--------'कडा' व --------'शिरोबिंदू' असतात.
अ) १६,१६ ब) ८,१२ क) १२,८ ड) ८,८
७८. १४० से.मी. लांबी व १३० से.मी. रुंद असलेल्या आयताची परिमिती किती?
अ) २७० से.मी. ब) ५४० से.मी. क) १८२० सेमी. ड) १४८० से.मी.
७९. जर एका घन ठोकल्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २१६ से.मी.२ आहे. तर
त्याचे घनफळ काय असेल?
अ) १०८ से.मी.२ ब) ३६ से.मी.३ क) २१६ से.मी.२ ड) २१६ से.मी.३
८०. इतिहास काळात 'चंपावती नगर' या नावाने कोणते शहर ओळखले जात असे?
अ) औरंगाबाद ब) पुणे क) बीड ड) अंबेजोगाई
८१. बीड जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन कोणत्या शहरात आहे?
अ) बीड ब) अंबेजोगाई क) परळी-वेजानाथ ड) आष्टी
८२. बीड जिल्ह्यातून किती राष्ट्रीय महामार्ग जातात?
अ) १ ब) २ क) ० ड) ३
८३. 'सोताडा धबधबा' खालीलपैकी कोठे आहे?
अ) परळी ब) पाटोदा क) मांजरसुम्भा ड) नायगाव
८४. बीड जिल्ह्याला लागून किती जिल्ह्याच्या सीमा आहेत?
अ) ४ ब) ५ क) ६ ड) ७
८५. वडवणी व शिरूर-कासार हे दोन नवीन तालुके कधी अस्तित्वात आले?
अ) १९९९. ब) १९८९ क) १९९० ड) १९४८
८६. बीड जिल्यातील कोणत्या डोंगर रंग आहेत?
अ) अंबागड चे डोंगर ब) अजिंठ्याचे डोंगर क) बालाघाट चे डोंगर
ड) महादेव डोंगर
८७. बीड जिल्याचे क्षेत्रफळ किती?
अ) १०६९३ चो.मी. ब) १०६९३ कि.मी. क) १०६९३ चो.कि.मी. ड) १०६९३ हेक्टर
८८. बीड तालुक्यात 'शांतिवन' वन प्रकल्प कोठे आहे?
अ) अंबेजोगाई ब) मन्झरी क) बीड ड) आष्टी
८९. दूर अंतरावरून संगणक व दूरध्वनीच्या सहय्याने दिल्या जाणार्या माहिती
सेवेला काय म्हणतात?
अ) प्रचलित जागरूकता सेवा ब) ऑनलाईन सेवा क) ऑफलाईन सेवा ड)
निवडक माहिती सेवा
९०. MS-Word is a ----------
a) Operating system b) Excel Spread sheet c) Word processor d)
database Software

Compiled by My Preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Examination for the blog http://maharashtrapublicserviceexams.blogspot.com

No comments:

Post Top Ad